विद्युत तार तुटून पडल्याने ४ बकऱ्यांचा जागीच मृत्‍यू; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विद्युत वाहिनीच्या मेन लाइनचे इन्सुलेटर फुटून तार तुटली. ही तार अंगावर पडून चार बकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना पातुर्डा (ता. संग्रामपूर) शिवारात आज, १९ सप्टेंबरला दुपारी १२ च्या सुमारास घडली. मेंढपाळ ओंकार पुंडे हे स्वतःच्या व गावातील पशुपालकांच्या बकऱ्या, जनावरे चराईसाठी पातुर्डा खुर्द शिवारात गेले. बकऱ्या, मेंढरे पडीत शेतात चरत …
 
विद्युत तार तुटून पडल्याने ४ बकऱ्यांचा जागीच मृत्‍यू; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विद्युत वाहिनीच्या मेन लाइनचे इन्‍सुलेटर फुटून तार तुटली. ही तार अंगावर पडून चार बकऱ्यांचा मृत्‍यू झाला. ही घटना पातुर्डा (ता. संग्रामपूर) शिवारात आज, १९ सप्‍टेंबरला दुपारी १२ च्‍या सुमारास घडली.

मेंढपाळ ओंकार पुंडे हे स्वतःच्या व गावातील पशुपालकांच्या बकऱ्या, जनावरे चराईसाठी पातुर्डा खुर्द शिवारात गेले. बकऱ्या, मेंढरे पडीत शेतात चरत असताना अचानक विद्युत वाहिनीचे मेन लाईनचे इन्सुलेटर फुटून तार तुटून बकऱ्यांच्या अंगावर पडली. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. घटनेची माहिती पातुर्डा विद्युत वितरण कार्यालयाला कळवताच वायरमन राजू सोळंके, अमरसिंग पवार यांनी तात्काळ विद्युत पुरवठा खंडीत केल्याने व विद्युत कर्मचारी महेश गोयल, सुरेश वानखडे यांच्या सहकार्याने वायरमन पवार, सोळंके यांनी मेन लाईनचा इन्सुलेटर बसवून तुटलेल्या तारेची जोडणी करुन पुर्वरत विद्युत पुरवठा सुरू केला.

ओंकार पुंडे, फिरोज खान, राजू इंगळे, रमेश पुंडे यांच्‍या या ४ बकऱ्या आहेत. त्‍यांना महावितरण कंपनीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी या पशु पालकांनी केली आहे.

सहाय्यक अभियंता व्ही. बी. बोर्डे म्हणाले, नियमानुसार आर्थिक मदत देऊ!
घटनास्थळ पंचनामा, उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त होताच विद्युत वितरण विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येईल, असे सहाय्यक अभियंता विजय बोर्डे यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले.