वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जिल्हाधिकारी संग्रामपूरमध्ये!
संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः अचानक संग्रामपूर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने दस्तूरखुद्द जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज, 28 मे रोजी तालुक्याचा दौरा केला आणि बाधितांची माहिती घेत उपाययोजनांबाबत सूचना केल्या. निवाणा गावासह संग्रामपूर, वरवट बकाल कोविड सेंटरची पाहणी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार गटविकास अधिकारी होते. दौऱ्यात …
May 28, 2021, 22:17 IST
संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः अचानक संग्रामपूर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने दस्तूरखुद्द जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज, 28 मे रोजी तालुक्याचा दौरा केला आणि बाधितांची माहिती घेत उपाययोजनांबाबत सूचना केल्या.
निवाणा गावासह संग्रामपूर, वरवट बकाल कोविड सेंटरची पाहणी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार गटविकास अधिकारी होते. दौऱ्यात दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी वसाडी येथे जाऊन आग लागलेल्या इको सायन्स पार्कची पाहणी केली. आग कशी लागली, किती नुकसान झाले. या पार्कचे क्षेत्र किती आदी माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून घेतली. अंबाबारवा अभयारण्यात पर्यटनस्थळी जिल्हाधिकारी यांनी जाऊन पाहणी केली.