निर्भिडपणे करा मतदान…आम्ही तुमच्यासोबत.. पोलिसांनी पिंपळगाव राजा ग्रामस्थांना केले आश्वस्त!
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत पिंपळगाव राजा असून, या ग्रामपंचायतीची सध्या निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर गावात शांतता व सलोखा कायम राहावा, या उद्देशाने आज, 12 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते 10.30 दरम्यान पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकार्यांनी ठाणेदार सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गावात रूट …
Jan 12, 2021, 15:14 IST
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत पिंपळगाव राजा असून, या ग्रामपंचायतीची सध्या निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर गावात शांतता व सलोखा कायम राहावा, या उद्देशाने आज, 12 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते 10.30 दरम्यान पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकार्यांनी ठाणेदार सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गावात रूट मार्च काढला. यावेळी नागरिकांना आगामी निवडणुकीत निर्भीडपणे कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन ठाणेदार सचिन चव्हाण यांनी केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक योगेश धोत्रे व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते, असे पो. काँ. संतोष डागोर यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना सांगितले.