दुर्गा दौड आयोजित करणाऱ्या ९ जणांविरुद्ध शेगावमध्ये गुन्‍हा दाखल

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगावमध्ये दुर्गा दौड आयोजित करत सव्वाशे भाविकांना त्यात सहभागी करून घेतले. यामुळे कोरोनाविषयक नियमांचा भंग झाला. पोलीस उपनिरिक्षक योगेशकुमार दंगे यांच्या तक्रारीवरून ९ जणांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेश्वर धमाळ, शुभम विठ्ठल ढगे, आकाश गावंडे, श्रीकांत देशमुख, गणेश वसतकार, ज्ञानेश्वर पाटणे, अक्षय शेठ, श्याम अधव, प्रवीण मोरखडे …
 
दुर्गा दौड आयोजित करणाऱ्या ९ जणांविरुद्ध शेगावमध्ये गुन्‍हा दाखल

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगावमध्ये दुर्गा दौड आयोजित करत सव्वाशे भाविकांना त्‍यात सहभागी करून घेतले. यामुळे कोरोनाविषयक नियमांचा भंग झाला. पोलीस उपनिरिक्षक योगेशकुमार दंगे यांच्‍या तक्रारीवरून ९ जणांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

नेश्वर धमाळ, शुभम विठ्ठल ढगे, आकाश गावंडे, श्रीकांत देशमुख, गणेश वसतकार, ज्ञानेश्वर पाटणे, अक्षय शेठ, श्याम अधव, प्रवीण मोरखडे (सर्व रा. शेगाव) अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिवाजी महाराज चौकातून आज, १३ ऑक्‍टोबरला सकाळी सहा वाजता दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले होते. शेगाव शहरातील लहान मुले, महिला, पुरुष असे १०० ते १२५ भाविक या दौडमध्ये सहभागी झाले. कोरोना खबरदारीच्या कोणत्याही उपाययोजना दौडमध्ये करण्यात आल्या नव्हत्या. रॅलीत घोषणाबाजी करण्यात आली, असे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास सुरू आहे.