घारोड येथील रेशन दुकानदाराला दणका!; परवाना निलंबित; नागरिकांना धान्यापासून ठेवत होता वंचित

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हक्काच्या स्वस्त धान्यापासून नागरिकांना वंचित ठेवल्या प्रकरणी घारोड (ता. खामगाव) येथील एम. एस. थेटे यांच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. घारोडच्या ग्रामस्थांनी याप्रकरणाची तक्रार तहसीलदारांकडे केली होती. यावर कारवाई न झाल्यास पाच जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यामुळे तहसीलदारांनी ही कारवाई केली. लॉकडाऊनकाळात प्रत्येक शिधापत्रिका धारकांना धान्य …
 
घारोड येथील रेशन दुकानदाराला दणका!; परवाना निलंबित; नागरिकांना धान्यापासून ठेवत होता वंचित

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हक्काच्या स्वस्त धान्यापासून नागरिकांना वंचित ठेवल्या प्रकरणी घारोड (ता. खामगाव) येथील एम. एस. थेटे यांच्‍या रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. घारोडच्‍या ग्रामस्‍थांनी याप्रकरणाची तक्रार तहसीलदारांकडे केली होती. यावर कारवाई न झाल्यास पाच जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्‍यामुळे तहसीलदारांनी ही कारवाई केली.

लॉकडाऊनकाळात प्रत्येक शिधापत्रिका धारकांना धान्य उपलब्ध करून द्यावे, असे शासनाचे आदेश असतानाही थेट यांच्या दुकानातून धान्य मिळाले नाही. नागरिकांनी अन्‍न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा याप्रकरणी तक्रारी दिल्या होत्या. तक्रारीची दखल घेत तहसीलदारांनी थेटे यांच्या दुकानाचा परवाना निलंबित केला आहे. थेटे यांच्या दुकानातून धान्य घेणाऱ्या नागरिकांसाठी निरोड (ता. खामगाव) येथील बी. बी. लांडे यांचे रेशन दुकानात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.