…अन्यथा नांदुऱ्यात 693 मतदारांची नावे यादीतून होणार कट!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील 693 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांनी या मतदारांच्या छायाचित्रासाठी त्यांच्या घरी वारंवार भेटी दिल्या. मात्र पत्त्यावर दिसून येत नाहीत. चौकशी केली असता ते दुसऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचे छायाचित्र मतदार यादीत नसल्यामुळे नाव वगळण्याची कार्यवाही नाईलाजास्तव करावी …
 
…अन्यथा नांदुऱ्यात 693 मतदारांची नावे यादीतून होणार कट!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील 693 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांनी या मतदारांच्‍या छायाचित्रासाठी त्‍यांच्‍या घरी वारंवार भेटी दिल्या. मात्र पत्त्यावर दिसून येत नाहीत. चौकशी केली असता ते दुसऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचे छायाचित्र मतदार यादीत नसल्यामुळे नाव वगळण्याची कार्यवाही नाईलाजास्तव करावी लागणार आहे. अजूनही 14 जूनपर्यंत जर त्यांनी त्यांचे रंगीत छायाचित्र नांदुरा तहसील कार्यालयात आणून दिले नाही तर त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, असे तहसीलदार राहुल तायडे यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना सांगितले.