धक्कादायक… बघा हे महिलाराज! सरपंचपतीची मासिक सभेत घुसखोरी; सरपंच म्हणाल्या, माझे पती आहेत, इथेच बसतील!!; पातोंडा पेडका ग्रामपंचायतीतील प्रकार

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिलाराज कसं नावालाच चालतंय, याचं दर्शनच आज, २१ सप्टेंबरला सकाळी खामगाव तालुक्यातील पातोंडा पेडका ग्रामपंचायतीत घडलं. सरपंचपतीने मासिक सभेत घुसखोरी केली. सदस्यांनी याबद्दल सरपंचांकडे नाराजी व्यक्त केली तर त्या म्हणाल्या, हे माझे आहेत, ते इथेच बसतील..! या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याकडे जिल्हा परिषद मुख्य …
 
धक्कादायक… बघा हे महिलाराज! सरपंचपतीची मासिक सभेत घुसखोरी; सरपंच म्हणाल्या, माझे पती आहेत, इथेच बसतील!!; पातोंडा पेडका ग्रामपंचायतीतील प्रकार

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिलाराज कसं नावालाच चालतंय, याचं दर्शनच आज, २१ सप्‍टेंबरला सकाळी खामगाव तालुक्‍यातील पातोंडा पेडका ग्रामपंचायतीत घडलं. सरपंचपतीने मासिक सभेत घुसखोरी केली. सदस्यांनी याबद्दल सरपंचांकडे नाराजी व्‍यक्‍त केली तर त्‍या म्‍हणाल्या, हे माझे आहेत, ते इथेच बसतील..! या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतील, याकडे आता लक्ष लागले आहे.

सकाळी दहाला ही मासिक सभा होती. सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक सभेला आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य गजानन मधुकर तायडे यांनी मासिक सभा चालू झाल्यानंतर सरपंचपती अनिल जाधव यांना ग्रामपंचायतीच्या बाहेर जाण्यास सांगितले. तेव्‍हा महिला सरपंच खवळल्या. “ते माझे पती आहेत ते इथेच बसतील. त्यांनासुद्धा सभेत बसायचा अधिकार आहे,’ असे त्‍या म्‍हणाल्या. मात्र तरीही ग्रामसेवकांनी सरपंचपतींना बाहेर जाण्यास सांगितले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार नक्की स्वतः सरपंच चालवतात की सरपंचपती, असा संभ्रम पातोंडा पेडकाच्या ग्रामस्‍थांना पडला आहे.