कीर्तन, प्रवचनकारांना आर्थिक मदत मिळावी; शेगावमधून राज्‍य सरकारला “साकडे’

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जे लोक खरंच कलावंत आहेत आणि समाज सुधारणेसाठी कीर्तन-प्रवचन करून समाज घडवतात अशांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी वारकरी साहित्य परिषद व कीर्तनकार मंडळीतर्फे शेगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. समाज जनजागृती कार्यक्रम व धार्मिक सप्ताह बंद असल्यामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा अंतर्गत …
 
कीर्तन, प्रवचनकारांना आर्थिक मदत मिळावी; शेगावमधून राज्‍य सरकारला “साकडे’

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जे लोक खरंच कलावंत आहेत आणि समाज सुधारणेसाठी कीर्तन-प्रवचन करून समाज घडवतात अशांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी वारकरी साहित्य परिषद व कीर्तनकार मंडळीतर्फे शेगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

समाज जनजागृती कार्यक्रम व धार्मिक सप्ताह बंद असल्यामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा अंतर्गत आमच्याही सांप्रदायिक व राष्ट्रीय कीर्तनकार, प्रवचनकारांना मदत मिळावी तसेच त्यांच्या नावाची नोंद मिळणाऱ्या मानधन निधीत करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

निवेदनावर हभप सुशील महाराज वनवे, हभप रामकृष्ण महाराज ताकोते, हभप गणेश महाराज जवंजाळ, हभप भिकाजी महाराज मिरगे, हभप प्रभुरंजन महाराज सहस्त्रबुद्धे, ज्ञानदेव महाराज तायडे, हभप ज्ञानेश्वर महाराज फोकमारे, हभप ज्ञानेश्वर महाराज, हभप राम महाराज वाघ, हभप महेंद्र महाराज ठोंबरे, हभप संतोष महाराज वासतकर, हभप अभिषेक महाराज पवार, हभप श्याम महाराज वाघ, हभप सिद्धेश्वर महाराज टिकार, हभप कुंदन महाराज इंगोले, बाबुराव महाराज लंके तसेच वारकरी संप्रदायातील वारकरी कीर्तनकार मंडळी उपस्थित होती.