साजिद खानवर शर्लिन चोप्राचाही आरोप
मुंबई : चित्रपट निर्माता साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणार्यांत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. मॉडेल कम अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही आता साजिदवर आरोप केले असून, तिने जे सांगितले ते ऐकून सर्वच थक्क झाले आहेत. शर्लिनने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, की वडिलांच्या मृत्यूनंतर मी एप्रिल 2015 मध्ये साजिदला भेटायला गेले होते. …
Feb 2, 2021, 14:32 IST
मुंबई : चित्रपट निर्माता साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणार्यांत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. मॉडेल कम अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही आता साजिदवर आरोप केले असून, तिने जे सांगितले ते ऐकून सर्वच थक्क झाले आहेत. शर्लिनने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, की वडिलांच्या मृत्यूनंतर मी एप्रिल 2015 मध्ये साजिदला भेटायला गेले होते. त्यावेळी त्याने अश्लील कृत्य करत छेड काढली. मात्र तेव्हाच त्याला माझ्या भेटी मागचा हा उद्देश नव्हता, असे सांगितल्याचे शर्लिन म्हणाली. दरम्यान, अभिनेत्री जिया खानची बहीण करिश्मा हिनेही गेल्या आठवड्यात साजिदवर आरोप केले होते.