सलमान-कतरिना एकत्रच विदेशात रवाना…
‘टायगर ३’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ परदेशी रवाना झाले आहेत. यशराज प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत आहे.निर्माता आदित्य चोप्राने शूटिंगच्या टीमसाठी खास सोय केली असून, कोरोनाचे वातावरण बघता एका खास जेट विमानाने संपूर्ण टीम नुकतीच परदेशी रवाना झाली. रशिया, टर्की, ऑस्ट्रेलियासह इतरही देशांत या चित्रपटाचे शूटिंग हाेणार आहे. ‘एक था टायगर’पासून …
Aug 26, 2021, 16:34 IST
‘टायगर ३’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ परदेशी रवाना झाले आहेत. यशराज प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
निर्माता आदित्य चोप्राने शूटिंगच्या टीमसाठी खास सोय केली असून, कोरोनाचे वातावरण बघता एका खास जेट विमानाने संपूर्ण टीम नुकतीच परदेशी रवाना झाली. रशिया, टर्की, ऑस्ट्रेलियासह इतरही देशांत या चित्रपटाचे शूटिंग हाेणार आहे. ‘एक था टायगर’पासून या चित्रपटाच्या मालिकेची सुरुवात झाली आहे. आताचा तिसरा भाग आहे. यापूर्वीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची चांगली पसंती लाभली होती. पहिला भाग २०१२, दुसरा भाग ‘टायगर जिंदा हैं’ २०१७ साली प्रदर्शित झाला होता. तिसऱ्या भागातही सलमान पुन्हा रॉ एजंट दिसेल तर कॅटरिना आयएसआय एजंट झोयाच्या भूमिकेत कायम आहे. इमरान हाश्मीसुद्धा तिसऱ्या भागा असून, तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.