पैशांसाठी म्‍हाताऱ्यासोबत लग्‍न… जुहीवर झाला होता आरोप, पण प्रेम होतं म्‍हणून नातं टिकलं!

मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः अभिनेत्री जुही चावलाचे पती जय मेहता तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे आहेत. तिने सहा वर्षे आपले लग्न झाल्याची माहिती लोकांपासून लपवून ठेवली होती. पण जेव्हा ही बाब समोर आली तेव्हाही तिला पतीच्या वयामुळे बरेच टोमणे ऐकावे लागले. पैशांसाठी म्हाताऱ्यासोबत लग्न केल्याची टीकाही तिच्यावर झाली. पण यामुळे दोघांच्या नात्यात काहीही फरक पडला …
 

मुंबई (मुंबई लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अभिनेत्री जुही चावलाचे पती जय मेहता तिच्‍यापेक्षा 15 वर्षांनी मोठे आहेत. तिने सहा वर्षे आपले लग्‍न झाल्याची माहिती लोकांपासून लपवून ठेवली होती. पण जेव्हा ही बाब समोर आली तेव्हाही तिला पतीच्या वयामुळे बरेच टोमणे ऐकावे लागले. पैशांसाठी म्‍हाताऱ्यासोबत लग्‍न केल्याची टीकाही तिच्‍यावर झाली. पण यामुळे दोघांच्‍या नात्‍यात काहीही फरक पडला नाही.

समजूतदारपणा आणि अनुभव या दोन गोष्टींमुळे जुही आणि जय यांचे नाते मजबूत राहिले. एका मुलाखतीत जुही म्‍हणाली, की माझ्या लग्नाचे फोटो सर्वांसमोर आले होते. तेव्‍हा आमचे लग्न सर्वांसाठीच एक धक्का होता. यापूर्वी कोणालाही माझ्या प्रेमप्रकरणाबाबत माहिती नव्हती. मेहता यांच्या डोक्यावर केस कमी असल्याचे पाहून त्यांना लोक म्हातारा म्हणत होते.

वास्‍तवात त्‍यांचे वय तेव्‍हा ३३ होते. त्‍यांचे जुहीसोबत दुसरे लग्न होते. लग्नापूर्वीच आमच्या नात्याबद्दल आम्ही सखोल विचार केला. आता आम्ही एकत्र राहून २० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. वय नात्यासाठी केवळ एक संख्या आहे. ज्याचा समजूतदारपणाशी काहीही संबंध नाही, असे जुही म्‍हणाली. प्रेम आंधळे असतं, असे म्‍हणतात. तसंच जुहीच्‍या बाबतीत झालं आहे. प्रेमापुढे तिला जोडीदाराचे वय कधीच महत्त्वाचे वाटले नाही.