ऐकलंत का? एका आयटम साँगसाठी मलायका घेते पावणेदोन कोटी..!

मुंबई ः अभिनेत्री मलायका अरोरा आता ४७ वर्षांची झाली आहे. तिचा मुलगा अरहान सध्या १९ वर्षांचा आहे. काही वर्षांपासून मलायका तिच्यापेक्षा ११ वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली आहे. वयाच्या ४७ व्या वर्षीसुद्धा ती अगदी विशीतली तरुणीसारखी दिसते. एका अहवालानुसार मलायका अरोरा ही आयटम साँगसाठी एक कोटी ७५ लाख रुपये एवढी रक्कम घेते. नच …
 
ऐकलंत का? एका आयटम साँगसाठी मलायका घेते पावणेदोन कोटी..!

मुंबई ः अभिनेत्री मलायका अरोरा आता ४७ वर्षांची झाली आहे. तिचा मुलगा अरहान सध्या १९ वर्षांचा आहे. काही वर्षांपासून मलायका तिच्यापेक्षा ११ वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली आहे. वयाच्या ४७ व्या वर्षीसुद्धा ती अगदी विशीतली तरुणीसारखी दिसते. एका अहवालानुसार मलायका अरोरा ही आयटम साँगसाठी एक कोटी ७५ लाख रुपये एवढी रक्कम घेते.

नच बलीये, जरा नचके दिखा, झलक दिखला जा यांसारख्या रिॲलिटी शो मधूनसुद्धा भरपूर पैसे कमावते. या शोच्या एका एपिसोडसाठी ती ५ लाख रुपये घेते. रिॲलिटी शोच्या एका हंगामासाठी ती तब्बल एक कोटी रुपयाची रक्कम घेते. मल्लिकाने मुंबईत दिवा योग या नावाने एक योग स्टुडिओ सुरू केला असून, त्यातूनही ती भरपूर पैसे कमावते. मलायका शाही लाईफस्टाईल जगते. महागडे घर, महागड्या गाड्या यासह ७३ ते ७५ कोटी रुपयांच्या संपत्तीची ती मालकीण आहे. मुन्‍नी बदनाम हुई हे तिचे आयटम साँग सुपरहिट ठरले होते.