असे फुटले शिल्पा शेट्टीच्या पतीचे बिंग!

अश्लील चित्रपटाची निर्मिती केल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा उद्योजक पती राज कुंद्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्रा अश्लील चित्रपटांची निर्मिती करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी तो मोबाईल अॅपवर प्रदर्शित केला. अश्लील चित्रपटांची निर्मिती करायची, ते मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित करायचे असे काम एक टोळी करीत होती. मुंबई पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला. …
 

अश्लील चित्रपटाची निर्मिती केल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा उद्योजक पती राज कुंद्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्रा अश्लील चित्रपटांची निर्मिती करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी तो मोबाईल अॅपवर प्रदर्शित केला. अश्लील चित्रपटांची निर्मिती करायची, ते मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित करायचे असे काम एक टोळी करीत होती. मुंबई पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात एका अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. तपासात राज कुंद्रा यांचं पुढं आलं. त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होते. सात- आठ तास चाैकशी करून नंतर त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फेब्रुवारीमध्ये राज कुंद्रा यांच्या विरोधात अशाच प्रकारची तक्रार आली होती.

चौकशीदरम्यान राज कुंद्रा यांच्याविरोधात काही पुरावे आढळले. त्यांच्यासोबतच या प्रकरणात ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्रा यांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मार्च २०२० मध्ये शेट्टी-कुंद्रा दांपत्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली होती. आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात राज कुंद्रा अडकले होते. मुंबईतील मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यावर फेब्रुवारीत पोलिसांनी धाड टाकली होती. तिथं पॉर्नोग्राफिक शूटिंग होत होतं. त्या वेळी पोलिसांनी दोन अभिनेते, दोन तरुणींना अटक केली होती. या तरुणी अभिनयात नाव काढण्यासाठी आल्या होत्या; मात्र त्या पॉर्नोग्राफिक व्हिडिओ तयार करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकल्या.