वयाच्या ७० व्या वर्षी कबीर बेदीने का केले दुसरे लग्न? सांगितले हे कारण...
कबीर बेदीचे आतापर्यंत ४ लग्न झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्याने त्याने चौथे लग्न केले. परवीन बॉबीसोबतच्या त्याच्या अफेअरचे किस्से जगजाहीर आहेत. नुकतेच एका मुलाखतीत त्याने चौथ्या लग्नाबद्दल सांगितले. कबीर बेदीचे पहिले लग्न ओडिशा राज्यातील डान्सर प्रोतिमा गौरीसोबत झाले होते. दोघांना पूजा बेदी आणि सिद्धार्थ बेदी ही अपत्ये झाली. मात्र अवघ्या २६ व्या वर्षी तिने आत्महत्या केली होती. १९८० मध्ये ब्रिटिश फॅशन डिझायनर सुजेनसोबत कबीर बेदीने लग्न केले. मात्र हे नाते केवळ १० वर्षे टिकले.
सूजेनशी तलाक झाल्यानंतर १९९२ मध्ये कबीरने निक्की बेदीसोबत लग्न केले. २००५ मध्ये हे नाते तुटले. त्यानंतर त्याच वर्षी ७० व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी कबीर बेदीने परवीन दोसांजसोबत लग्न केले. मी नेहमी प्रोतीमाचा आभारी राहील. आम्ही दोघे वेगवेगळ्या दिशांना जात होतो. मात्र या वयात लग्न हा एक वेगळा अनुभव होता. या वयात लग्न का केले, असे विचारल्यावर कबीर बेदी म्हणाला की, मी जीवनात नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला. जे तुमच्याजवळ नाही किंवा जे होऊन गेले त्याबद्दल दुःखी राहण्यापेक्षा आहे त्या क्षणांचा आनंद घेणे मला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे या वयात लग्न केले, असे कबीर बेदीने सांगितले.