काय म्‍हणता... लग्‍नानंतर कॅटरिना भाड्याच्या घरात राहणार!

 
File Photo
मुंबई ः सध्या बॉलीवूडमधील प्रेमीयुगुलांच्या लग्नाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत. अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्‍यामुळे दोघांच्याही चाहत्यांमध्ये आनंदाचे सूर असून, लग्नानंतर कुठे राहायचे हेही जोडप्याचे ठरले आहे. पण दोघे भाड्याच्या घरात राहणार असून, ८ लाख रुपये प्रतिमहिना या घराचे भाडे असणार आहे.

पावणेदोन कोटी रुपये डिपॉझिट या घरासाठी या जोडप्याने दिले आहेत. भाड्याच्‍या घरात एवढा पैसा गुंतवल्यापेक्षा स्वतःचेच घर घेतले असते तर किती चांगले ना, असा प्रश्न तुम्‍हाला पडू देऊ नका. कारण हे भाड्याचे असले तरी घर लई भारी आहे... राजमहल नावाच्या अलिशान बिल्‍डिंगमध्ये हे घर आहे. आयुष्याची सुरुवात राजमहालातून करण्याचे स्वप्न या जोडप्याने बाळगलेले दिसतेय..! आणि दोघांचे शेजारी कोण असणार माहितेय का? चक्क अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. अर्थात ते त्‍यांना डिस्‍टर्ब नक्कीच करणार नाहीत. त्‍यामुळे तुम्‍ही चिंता करू नका...

रिअल-इस्टेट पोर्टलचे प्रमुख वरुण सिंग यांनी सांगितले, की ५ वर्षांसाठी विकीने हा अलिशान फ्लॅट भाड्याने घेतला आहे. ८ व्या मजल्यावर हा फ्‍लॅट आहे. सुरुवातीचे ३६ महिने ८ लाख रुपये प्रतिमहिना आणि नंतर पुढचे १२ महिने ८ लाख ४० हजार रुपये भाडं असणार आहे. शेवटचे १२ महिने आणखी भाडे वाढणार असून, ते ८ लाख ८२ हजार होईल. १ ते ७ डिसेंबर दरम्‍यान कतरिना आणि विकीने लग्न होईल, असे त्‍यांच्‍या कौटंुबिक सूत्रांकडून समजते. राजस्थानमधील सवाई माधोपूर या ठिकाणच्या सिक्स सेन्सेस राजमहालात हा अलिशान सोहळा होणार आहे.