ठरलं बरं... पुढच्या महिन्यात अंकिताचं लगीन!

 
अभिनेत्री अंकिता लोखंडेचं लग्‍न ठरलं आहे. ती प्रियकर विक्की जैनसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
दोघे साडेतीन वर्षांपासून प्रेमाच्या नात्यात आहेत. १२, १३ आणि १४ डिसेंबरला त्‍यांचं लग्‍न होईल, अशी माहिती त्‍यांच्‍या निकटवर्तींयांनी दिली. नुकत्याच झालेल्या एका पार्टीत सर्वांसमोर विक्की आणि अंकिता केलेल्या किसमुळे ते चर्चेत आले होते. अंकिता ही विक्कीच्या आधी सुशांत सिंह राजपूतच्या प्रेमात होती. काही वर्षे दोघे रिलेशनशीपमध्ये होते. पण त्‍यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपचं कारण सुशांत असल्याचे समोर आले होते.