ही अभिनेत्री झाली भावुक
Nov 7, 2021, 12:43 IST
‘सूर्यवंशी’ला पहिल्याच दिवशी मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून चित्रपटातील एक अभिनेत्री भावूक झाली असून, तिने व्हिडिओ जारी करत प्रेक्षकांचे आभार मानले.
हेलिन शास्त्री हिने छोटीशी भूमिका साकारलेली आहे. हेलिन तिच्या भूमिकेबद्दल व्हिडिओत सांगताना दिसत आहे. माझी भूमिका छोटीशी असली तरी लोक माझे कौतुक करत आहेत, असे ती म्हणाली. सूर्यवंशी माझ्यासाठी केवळ चित्रपट नसून, भावना आहेत, असे हेलिनने म्हटले आहे. सूर्यवंशीमध्ये हेलिनने मालविका गुप्ताची भूमिका साकारली असून, ती यात एटीएस टीमचा भाग आहे. याच टीमचा प्रमुख डीसीपी वीर सूर्यवंशी म्हणजेच अक्षयकुमार आहे. हेलिनने यापूर्वी ‘अलिफ लैला’ या मालिकेत तिने राजकुमारी साराची भूमिका केली होती. ‘विघ्नहर्ता गणेश’मध्ये ती देवीच्या रूपात दिसली होती.