रश्मीकाच्या साडीची किंमत ३१ हजार ५०० रुपये!
Updated: Jan 30, 2022, 10:45 IST
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मीका मंदाना देशभरात लोकप्रिय आहे. नॅशनल क्रॅश म्हणून तिची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिनेमात तिने श्रिवल्लीची भूमिका केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटातील रश्मीकाचा लूक तिच्या चाहत्यांना घायाळ करून गेलाय.
दरम्यान रश्मीकाने साडीतला एक फोटो तिच्या इंस्टाग्राम खात्यावर शेअर केला. हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. फोटोत रश्मिकाने एक गुलाबी साडी नेसलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिने ही साडी पुष्पा चित्रपटाच्या हैदराबाद येथे झालेल्या प्रमोशन सोहळ्यात नेसली होती. तिने नेसलेली साडी लुना साडी म्हणून परिचित आहे. ही साडी अंकिता जैनने डिझाईन केली आहे. अंकिता प्रसिद्ध साडी डिझायनर आहे. या साडीची किंमत ३१ हजार ५०० रुपये असल्याचे वृत्त इंडिया टुडेने म्हटले आहे.