उर्फीवर पुन्हा टीकेचा पाऊस!; कारणही तेच...
Nov 7, 2021, 12:46 IST
बोल्ड कपडे घालत असल्यामुळे अभिनेत्री उर्फी जावेद कायम टीकेच्या पावसात भिजत असते. अनेकदा तिला विचित्र कपड्यांत टिपले गेले आहे. विशेष म्हणजे ती स्वतःच हे विचित्र कपड्यांतील फोटो सोशल मीडियावर टाकते, त्यामुळे ट्रोल करणाऱ्यांचे फावते. तिच्या टीका करताना अनेक जण अक्षरशः पातळी ओलांडतात. तरीही तिला त्याचे काहीच वाटत नाही, हे विशेष. उलट चर्चेत राहण्याचं हे एक माध्यमच आहे, असे तिला वाटते.
आता तिने बॅकलेस टॉपमधील स्वतःचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. पांढरी पँट, गुलाबी बॅकलेस टॉप तिने घातलेला आहे. ताई शरीर दाखवणं फॅशन नाही. जरा चांगली फॅशन करा ना.... असे एकाने टीका करताना म्हटले आहे. कामं मिळावीत म्हणून बॉलिवूड निर्मात्यांचे लक्ष वेधतेय का, असे दुसरा एक ट्रोलर म्हटला आहे. एवढे तरी कशाला घालायचं.. हद्द झाली बाई तुझी... असेही एक ट्रोलर म्हणालाला आहे. २४ वर्षे वय असलेली उर्फी जावेद टीव्ही अभिनेत्री असून, ती मूळची लखनौची आहे. १५ ऑक्टोबर १९९७ ला जन्मलेल्या उर्फीने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलेला आहे. काही दिवस दिल्लीत फॅशन डिझायनर काम केल्यानंतर ती मुंबईत आली. २०१६ मध्ये सर्वप्रथम ती एका टिव्ही मालिकेत झळकली. बेपनाह या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती.