पूजा बनणार आई; म्हणाली, मुलगीच व्हावी!
कुमकुम भाग्य मालिकेतून घराघरात पोहोचलेली पूजा गोड बातमी सांगताना म्हणाली, की माझ्यात काही बदल जाणवत असल्याने मी शूटिंगला जाण्यापूर्वी ब्लड टेस्ट करायला गेले. त्या दिवशी दुपारी चारला मला रिपोर्ट मिळाले. हे रिपोर्ट पाहून माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. मी तातडीने पती संदीपला कॉल करून घ्यायला येण्यास सांगितले. पण त्याला लगेच ही गोड बातमी दिली नाही. त्याला मला फोनवर एवढी मोठी गूड न्यूज सांगायची नव्हती. त्याला जेव्हा ही बाब सांगितली, तेव्हा तोही अक्षरशः आनंदाने वेडा झाला. आम्हाला मुलगी हवी आहे, असे पूजा म्हणाली.
गूड न्यूज जेव्हा मालिकेच्या निर्मात्यांना सांगितली तेव्हा त्यांनीही आनंद व्यक्त करत इतक्यात मालिकेतील काम थांबविण्याची काही गरज नाही, असे सांगितले. अडचण असेल तर माझ्या जागी दुसरी कुणी रिप्लेस करा, असे मीच त्यांना म्हणाले होते. पण त्यांनी तसं काही सध्या तरी केलं नाही. उलट डिलिव्हरीनंतरही तूच काम कर, असे त्यांनी मला सांगितले. मला शूटिंग करताना कोणतीही अडचण येऊ नये, गैरसोय होऊ नये म्हणून सध्या सर्व जण काळजी घेत आहेत. एक कुटुंब कशापद्धतीने काम करतं, हेच यातून दिसून येते, असे पूजा म्हणाली.
पूजा सांगते, की आमचं प्लॅनिंग खरंतर २०२० मध्ये होतं. पण २०१९ मध्ये झालेल्या अपघातामुळे आम्ही ते टाळलं. अपघातानंतर आम्हाला पुन्हा त्याच गतीने काम करता येईल का, याचीही शंका होती. पण सर्वकाही व्यवस्थित झालं. दुसरं लॉकडाऊन लागल्यानंतर आम्ही बाळाबद्दलही गांभीर्याने घेतलं, असं सांगून पूजा म्हणाली, की बाळासाठी आम्हाला उशीर करायचा नव्हता. आरोग्य सांभाळून सध्या मी शूटिंग करतेय, असे ती म्हणाली. आता पूजाची डिलिव्हरी तारिख जसजशी जवळ येईल तस तशी प्रेक्षकांनाही तिच्याजागी मालिकेत कुणाला रिप्लेस करणार याची उत्सुकता लागली आहे.