महेश मांजरेकरच्या मुलीचे प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाशी अफेयर?
Jan 29, 2022, 18:05 IST
मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सलमान खानच्या दबंग चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. सई सध्या तिच्या रिलेशनशिपबद्दलच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला ती डेट करीत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियादवाला यांचा मुलगा सुभान नाडियादवाला याला सई डेट करत आहे. दोघांना अनेकदा लंच आणि डिनरला जाताना पाहण्यात आले आहे. मात्र दोघांनी फोटोग्राफरला फोटो न काढण्याची विनंती केली आहे. नुकतेच दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. मात्र दोघांनी एकत्र फोटो क्लिक करायला नकार दिला. त्यानंतर दोघेही आपापल्या कारमधून निघून गेले. सई आणि सुभानने मात्र त्यांच्या नात्याबद्दल अजून कोणताच खुलासा केला नाही. मात्र दोघेही वारंवार एकत्र दिसत असल्याने दोघांचे अफेयर सुरू आल्याची चर्चा रंगली आहे.