चला... ठरलं श्रद्धाही करणार लगीन!
Dec 8, 2021, 15:04 IST
मुंबई ः कॅटरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नानंतर आता आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. शक्ती कपूरची कन्या अभिनेत्री श्रद्धा कपूरही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे सूतोवाच तिची मावशी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे हिने केले आहे. श्रद्धा गेल्या काही दिवसांपासून फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत रिलेशनशीपमध्ये असून, दोघे लवकरच सातफेरे घेणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
पद्मिनी कोल्हापूरे यांनी त्यांचे जुने गाणे ये गलियाँ ये चौबारा... आता नव्या स्वरुपात सादर केले आहे. ते स्वतः त्यांनीच गायलं असून, श्रद्धाने ते तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअरही केले आहे. श्रद्धाच्या लग्नाबद्दल पद्मिनी यांना विचारले असता त्या म्हणाल्या, की पुढच्या वर्षीय सुरुवातीलाच श्रद्धाच्या लग्नात बेत असून, त्यादृष्टीने आमच्या कुटुंबात तयारीही सुरू झाली आहे. दोन्ही कुटुंबाचा दोघांच्या नात्याला कोणताही विरोध नाही. लग्न कुठे होईल, त्यात कोणाला बोलवायचे इथपासून तर खरेदीबद्दलच्या चर्चांना सध्या दोन्ही कुटुंबात वेग आल्याचेही त्यांनी सांगितले. लग्नाची निश्चित तारिख अद्याप ठरलेली नाही. लवकरच ती कळवू, असेही त्यांनी सांगितले. ये गलियाँ ये चौबारा... या गाण्यावर मी श्रद्धाच्या लग्नात नृत्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.