Chaderi News : …म्हणून हिना खानला केले रिजेक्ट!
मुंबई ः छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खानने तिच्या अभिनयामुळे स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. “ये रिश्ता क्या कहलाता हैं…’ ही तिची मालिका विशेष गाजली. “मैं भी बर्बाद’ नावाचा तिचा म्युझिक व्हिडिओसुद्धा नुकताच प्रदर्शित झाला अजून, यातील तिचा लूक एकदम भारी आहे. तिच्या या लुकचे चाहते कौतुक करीत आहेत. नुकतीच तिने मुंबई लाइव्हला मुलाखत दिली. यात तिने रंग सावळा असल्याने अनेक भूमिका मिळाल्या नसल्याचे सांगितले. स्वतः काश्मिरी असूनही रंग जास्त गोरा नसल्याने मला काश्मिरी मुलीच्या भूमिकेसाठी रिजेक्ट करण्यात आले, तेव्हा खूप वाईट वाटल्याचे ती म्हणाली. विशेष म्हणजे मी काश्मिरी मुलीसारखी दिसत नाही, असा ठपका माझ्यावर ठेवण्यात आला होता, असे हिना म्हणाली. मी काश्मिरी असल्याने मला भाषा कळत होती. त्यामुळे ती भूमिका अधिक चांगल्या प्रकारे करू शकले असते. मात्र माझा सावळा रंग चित्रपटाच्या टीमला आवडला नाही, असे ती म्हणाली.