आमिर खानची मुलगी म्हणते, आता यापुढे नेहमी साडी नेसणार!
Jan 19, 2022, 13:42 IST
बॉलिवूड अभिनेता आमिर खान प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याची मुलगी आयरा खान ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित अनेक बाबी ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेयर करत असते. नुकतेच आयराने तिचे साडी नेसलेले फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खूपच स्टायलिश दिसत आहे.
रविवारी तिने साडी नेसलेला फोटो पोस्ट केला. ही माझ्या आईची साडी आहे, असे तिने सांगितले. गोल्डन बॉर्डरच्या या प्रिंटेड साडीवर आयराने काळे ब्लाऊज घातले आहे. यासोबतच तिने घातलेले पांढऱ्या रंगाचे बूटसुद्धा लक्ष वेधून घेत आहेत. तिने फोटो शेअर करताना आय लव्ह साडी. आता प्रत्येक रविवारी मी साडी नेसणार आहे. माझ्याकडे भरपूर साड्या नाहीत. ही आईची साडी आहे, असे म्हटले आहे.