रिचाने सांगितले लग्न सतत पुढे ढकलण्याचे कारण!; तुम्ही ऐकून डोक्‍यावर हात माराल!!

 
पडद्यावर दमदार अभिनय आणि व्यक्तिगत जीवनात रोखठोक वक्‍तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रिचा चढ्ढा सध्या चर्चेत आहे. द ग्रेट इंडियन मर्डर ही तिची वेबसिरिज नुकतीच रिलीज झाली आहे. याशिवाय निर्माता म्हणून तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित करण्याची सुद्धा तयारी सुरू आहे. रिचा चढ्ढा तिचा बॉयफ्रेंड अली फजलसोबत लग्न कधी करणार, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. एका मुलाखतीत नुकतेच तिने याविषयावर भाष्य केले. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, की जेव्हा आम्ही लग्नाचा विचार करतो, कोरोनाचा नवा व्हेरीयंट येतो आणि लग्नाचा प्लॅन आम्हाला पुढे ढकलावा लागतो, असे ती म्हणाली.

द ग्रेट इंडियन मर्डर या सिरीजमध्ये रिचाने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आव्हानात्मक भूमिका करायला मला आवडते, असे ती म्हणाली. अनेक अभिनेत्रींना ग्लॅमरस जगायला आवडते. तुला तसे आवडत नाही का, असे तिला विचारले असता ती म्हणाली, की मी आतापर्यंत तसा प्रयत्न केला नाही. यापुढे करेल असे वाटत नाही. मला काम मिळत आहे.

करिअरसुद्धा योग्य मार्गावर आहे. माझ्या परिवाराचा चित्रपट सृष्टीशी संबंध नाही. असे असताना आज मी ज्या ठिकाणी पोहोचले आहे त्यावरून ग्लॅमरस जीवन जगलेच पाहिजे, असे मला आवश्यक वाटत नाही. याआधीचे जे स्टार्स आहेत, तेसुद्धा नॉर्मल जगत होते. मी एकदा हेमा मालिनी यांना विमानात भेटले होते. तेव्हा त्यांनी दही आणि भाताचे जेवण घेतले. एवढ्या महान असूनही त्या किती साध्या जगतात. त्यामुळे मी प्रभावित झाले होते.

२०२० मध्ये लग्न होणार हे जवळपास पक्के ठरले होते. मात्र लग्नाचा प्लॅन बनवला आणि कोरोनाचा नवा व्हेरीयंट आला. आमच्या अनेक नातेवाइकांनी तिकीटसुद्धा बुक केले होते. त्यांना ते कॅन्सल करावे लागले. त्यामुळे आता लग्न कधी होईल यावर मी बोलणार नाही. नाहीतर पुन्हा एखादा नवा व्हेरीयंट येईल, असे ती हसत हसत म्हणाली.