जॉन अब्राहम म्हणाला, मी बाॅलीवूडचा हिरो, साऊथचे सिनेमे नाही करणार!

 
मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा अटॅक चित्रपट आज, १ एप्रिलला प्रदर्शित झाला. काही दिवसांआधी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जॉन अब्राहमने प्रादेशिक चित्रपटांबद्दल विशेषतः दाक्षिणात्य चित्रपटाबद्दल त्याचं मत व्यक्त केलं.

जॉन म्हणाला की,  प्रभासच्या सालार सिनेमात मी काम करणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे अफवा आहेत. मी हिंदी सिनेमाचा हिरो असून, त्यातच काम करणार आहे. मी कधीही प्रादेशिक सिनेमात काम करणार नाही. दाक्षिणात्य सिनेमात दुय्यम अभिनेता म्हणून काम करण्याची माझी इच्छा नाही, असे जॉन म्हणाला. अटॅक सिनेमाबद्दल जॉन म्हणाला, की दर्शकांसाठी मी एक उत्कृष्ट चित्रपट घेऊन आलो आहे. जर मला माझ्या चित्रपटावर विश्वास नसता तर मी एवढा प्रचार केलाच नसता, असे तो म्हणाला. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंह, प्रकाश राज हेही प्रमुख भूमिकेत आहेत.