तुम्हाला माहितेय अक्षरा सिंह इतकी सुंदर का दिसते?
वयाच्या १६ व्या वर्षीच अक्षरा अभिनय क्षेत्रात आली होती. तिची आईसुद्धा एक कलाकार आहे. तिची आई सध्या ईमली या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहे. तिच्या आईचे सौंदर्य पाहून अक्षरा अगदी तिच्या आईवरच गेली असे कुणीही म्हणेल. अक्षराच्या सौंदर्याचे रहस्य म्हणजे तिच्या आईचा घरगुती उपाय आहे. अक्षराने स्वतः एका व्हिडिओत याबद्दल सांगितले होते. अक्षरा सध्या जरी दिवसभर मेकअपमध्ये वावरत असली तरी त्वचेची काळजी घेण्यावर तिचा भर आहे. अक्षराची आई अक्षरासाठी फेसपॅक बनवते.
यात दही, ओट्स आणि मसूरच्या डाळीचा उपयोग करते. मसूरची डाळ, दही आणि ओट्स बारीक करून एकत्र केल्यानंतर ते मिश्रण ते फेसपॅक म्हणून चेहऱ्यावर लावते. काही वेळानंतर साध्या पाण्याने चेहरा धुते. या उपायांमुळे चेहऱ्यावरील मृत पेशी सहजरीत्या निघून जातात. जेवणात ती फळांचा आणि पालेभाज्यांच्या जास्त उपयोग करते. अक्षराला बाहेर जेवायला जाणे आवडत नाही. याशिवाय मैद्याच्या चपात्या जेवणात नकोच, असेही ती सांगते. सकाळी उठल्यानंतर ती आधी पाणी पिते. त्यानंतर व्यायाम आणि योगा यावर सुद्धा तिचा भर आहे. शरीरातून जेवढा जास्त घाम निघेल तेवढा त्वचेचा ग्लो अधिक वाढतो, असे अक्षरा सांगते.