भूमी पेडणेकर म्हणाली, लैंगिक अत्‍याचाराच्या बातम्या रात्रभर झोपू देत नाहीत..!

 
बॉलिवूडमध्ये ७ वर्षांपासून काम करणारी भूमी पेडणेकर नेहमी कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून चर्चेत राहते. बधाई दो हा तिच्या ७ वर्षांच्या कारकिर्दीतील दहावा चित्रपट आहे. या चित्रपटात गे आणि लेस्बियन या मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला आहे. हसत खेळत एलजीबीटीक्यू समुदायाबद्दल लोकांची समज वाढावी असा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आल्याचे भूमीचे म्हणणे आहे. एका मुलाखतीत तिने तिचा अभिनय प्रवास, महिलांचे मुद्दे यावर भाष्य केले आहे.

दर्जेदार आणि वेगवेगळ्या कथानकाचा भाग होण्याचे भाग्य मिळाले. प्रेक्षकांनी माझ्या अभिनयाचे कौतुक केले. माझ्या चुकांचाही स्वीकार केला. येत्या २७ फेब्रुवारीला बॉलिवूडमध्ये मला ७ वर्षे पूर्ण होतात यावर विश्वास बसणे मला स्वतः ला कठीण झालेय, असेही भूमी म्हणाली. चित्रपटाच्या माध्यमातून लोकांचे हृदय परिवर्तन करता येते. अभिनयाच्या माध्यमातून महत्त्वाचे विषय लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी माझे प्रयत्न असतात, असेही भूमी म्हणाली.

महिलांसोबत होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना मला विचलित करतात. या विषयावर मी सोशल मीडियावर सुद्धा आवाज उठवला आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या बातम्या मला रात्रभर झोपू देत नाहीत, असेही भूमी म्हणाली. सलमान खानसोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. याआधीही मुलाखतीत मी तसे सांगितले होते. मात्र अजून इच्छा पूर्ण झाली नाही. आगे आगे देखो क्या होता है... पूर्ण भारत ज्याचा फॅन आहे त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहेच, असे भूमी म्हणाली.