६० व्या वर्षी सैफ होणार पुन्हा बाप!
Updated: Apr 2, 2022, 17:23 IST
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडींपैकी आहे. २०१२ मध्ये सैफ अली खान आणि करिनाचे लग्न झाले. सैफचे हे दुसरे लग्न होते. सैफला त्याची पहिली बायको अमृता सिंहपासून सारा अली खान आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत, तर करिनाने २०१६ साली तैमूर आणि गेल्या वर्षी जहागीरला जन्म दिला होता.
नुकताच करिनाला सैफ व मुलांबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर करिना म्हणाली की, सैफला प्रत्येक दशकात एक मूल झाले आहे. त्याला त्याच्या वयाच्या २० व्या वर्षी, ३० व्या वर्षी, ४० व्या आणि ५० व्या वर्षीही मुले झाली आहेत. मात्र त्याची कितीही इच्छा असली तरी ६० व्या वर्षी मूल नको, अशी ताकीद त्याला दिली असल्याचे करिना म्हणाली. सैफ आधुनिक विचारांचा आहे. त्याच्यासारखा आधुनिक विचारांचा माणूसच वेगवेगळ्या टप्प्यांवर चार मुलांचा बाप होऊ शकतो, असे करिना म्हणाली. सध्या तो त्याच्या चारही मुलांना पूर्ण वेळ देत असतो. सैफ सध्या छोट्या जहागीरसोबत जास्त वेळ घालवतो. जेव्हा तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी जातो तेव्हा मी घरी थांबायचे आणि जेव्हा मी शूटिंगसाठी जाईल तेव्हा त्याने घरी थांबून लेकरांना सांभाळायचे, असे आमच्यात ठरले होते, असे करिना म्हणाली.