अल्लू अर्जुनसोबत काम करण्यास आलिया आतूर
लवकरच आलिया संजय लीला भन्साळीच्या गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया माफिया क्वीनची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय अजय देवगण, विजय राज आणि हुमा कुरेशीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावर्षी लागोपाठ अनेक चित्रपटांत आलिया दिसणार आहे.
दिग्दर्शक एस. एस. राजमौलीच्या आरआरआर या चित्रपटात ती दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआर याच्यासोबत दिसणार आहे. यासोबत अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. आलिया म्हणाली, की पुष्पा बघितल्यानंतर माझ्या परिवारातील सर्वच अल्लू अर्जुनचे चाहते झाले आहेत. तुला अल्लूसोबत काम करण्याची संधी कधी मिळणार, असे मला माझ्या घरचे विचारत आहेत. मला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यास आनंद होईल, असे आलिया म्हणाली.