सैफ अली खान म्हणतो, “मी फक्त नावालाच नवाब… पतौडी पॅलेसची सर्व संपत्ती माझ्याकडे नाही तर…

मुंबई : नुकताच भूत पुलीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे शूटिंग सैफ अली खानच्या वडिलोपार्जित पतौडी राजवाड्यात झाले होते. या चित्रपटातील कलाकार सैफ अली खान, जॅकलीन फर्नांडिस, यामी गौतम कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते. या शोमध्ये सैफ अली खानने नुकताच त्याच्या संपत्तीबद्दलचा खुलासा केला. शो दरम्यान कपिल शर्माने सैफला गोंधळून टाकणारा प्रश्न …
 
सैफ अली खान म्हणतो, “मी फक्त नावालाच नवाब… पतौडी पॅलेसची सर्व संपत्ती माझ्याकडे नाही तर…

मुंबई : नुकताच भूत पुलीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे शूटिंग सैफ अली खानच्या वडिलोपार्जित पतौडी राजवाड्यात झाले होते. या चित्रपटातील कलाकार सैफ अली खान, जॅकलीन फर्नांडिस, यामी गौतम कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते. या शोमध्ये सैफ अली खानने नुकताच त्याच्या संपत्तीबद्दलचा खुलासा केला.

शो दरम्यान कपिल शर्माने सैफला गोंधळून टाकणारा प्रश्न विचारला. तू या चित्रपटात अभिनेता म्हणून जास्त कमाई केली की तुझा राजवाडा शूटिंगसाठी भाड्याने देऊन?. त्‍यावर दोन्हीही, असं उत्तर सैफने दिले. सैफ म्हणाला, की पतौडी पॅलेसमधून येणारा सर्व पैसा माझी आई शर्मिला टागोर घेते. मी फक्त नावालाच नवाब आहे, असे तो म्‍हणाला.