शुटींगच्यावेळी ब्लाऊज फाटल्याने राखी सावंत भडकली

मुंबई : एखाद्या फॅशन शोच्यावेळी मॉडेल/ अभिनेत्रींचा ड्रेस फाटला उसवला किंवा अभिनेत्री पायात पाय अडखळून पडल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. गाण्याचे चित्रिकरण अगदी रंगात आले आहे… अभिनेत्री रंगात येऊन डान्स करत आहे आणि नेमका त्याचवेळी अभिने़त्रीचा ड्रेस फाटला तर ? त्यावेळी होणारी फजिती अभिनेत्री लवकर विसरू शकत नाही. असा काहीसा प्रकार अभिनेत्री राखी सावंतच्या …
 

मुंबई : एखाद्या फॅशन शोच्यावेळी मॉडेल/ अभिनेत्रींचा ड्रेस फाटला उसवला किंवा अभिनेत्री पायात पाय अडखळून पडल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. गाण्याचे चित्रिकरण अगदी रंगात आले आहे… अभिनेत्री रंगात येऊन डान्स करत आहे आणि नेमका त्याचवेळी अभिने़त्रीचा ड्रेस फाटला तर ? त्यावेळी होणारी फजिती अभिनेत्री लवकर विसरू शकत नाही. असा काहीसा प्रकार अभिनेत्री राखी सावंतच्या बाबतीत घडला आहे. त्याचे असे झाले की,बिग बॉसफेम अभिनेत्री राखी सावंत क्लबसाठी गाण्याचे शुटींग करत होती.गाण्याच्या नृत्याचीही तिने भरपूर प्रॅक्टिस केली होती. त्यामुळे आता अंतिम शुट सुरू होणार होते. डायरेक्टरने अ‍ॅक्शन म्हणून ऑर्डर दिल्यानंतर राखीने गाण्यावर नृत्य सुरू केले आणि अचानक पाठीवर तिचे ब्लाऊज फाटले. हा प्रकार लक्षात येताच राखी जाम भडकली. तिने हेअरड्रेसर,निर्माता व दिग्दर्शकास शिव्यांची लाखोली वाहिली. मी काही ऐरीगैरी अ‍ॅक्ट्रेस आहे का? असा फाटका ड्रेस घालून मी शुटींग कसे करू? असे म्हणत तिने जाहीररित नाराजी व्यक्त केली. त्यावर निर्मात्याने नवीन ड्रेसची व्यवस्था करतो असे तिला सांगितले. तर हेअर ड्रेसर सुईदोरा घेऊन तिचा उसवलेला ब्लाऊज शिवण्यासाठी पुढे सरसावल्या.पण तोवर राखीचा तोंडाचा पट्टा सुरूच होता. आम्ही आर्टिस्टमंडळी टेक देण्यासाठी जातो तेव्हा सगळे परफेक्ट हवे असते. असे तिचे म्हणणे होते. राखीचा ब्लाऊज शिऊन होईपर्यंत व नव्या ब्लाऊजची होईपर्यंत शुटींग खोळंबले. विशेष म्हणजे राखीनेच ही घटना फोटो व प्रसांगाचा व्हिडिओ शुट करून तो व्हायरल केला आहे. अनेक फॅन्सनी मात्र हा तिचा प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचा दावा करत राखीलाच शिव्या घातल्या आहेत.