शाहरुखने केले गणपती विसर्जन… कट्टरपंथी म्हणतात, शाहरुख तू इस्लाम धर्म विसरलास!
मुंबई ः काल गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी आपापल्या घरी गणेशाची स्थापना केली होती. सर्वांनीच लाडक्या बाप्पाला काल निरोप दिला. याचे फोटोही सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले. अभिनेता शाहरुख खानने त्याच्या घरी श्री गणेशाची स्थापना केली होती. काल त्याने गणेशाचे विसर्जन केले. यावेळी बाप्पाचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर टाकला. त्यावर शाहरुख सर्वधर्मसमभाव जोपासतो, अशा कौतुकाच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. मात्र दुसरीकडे कट्टरपंथी मात्र खवळले आहेत. त्यांनी शाहरुख खानला ट्रोल केले आहे. तू हे काय करीत आहे. तुला आपल्या इस्लाम धर्माचा विसर पडला आहे. फक्त काही लोकांच्या आनंदासाठी तू सगळ्या सीमा ओलांडल्या आहेत. देव तुला नक्कीच चांगल्या मार्गावर आणेल. तुला एका मुस्लिम कुटुंबाचा भाग असल्याचा विसर पडला आहे, असे शाहरुखला कट्टरपंथीयांनी सुनावले आहे.