मिलिंद सोमनने केला पत्नीला किस केलेला फोटो शेअर

मुंबई : गुणी (?)अभिनेता मिलिंद सोमन हा कायम चित्रविचित्र घटना, घडामोडींसाठी चर्चेत असतो. आपल्यासोबत वयाने निम्म्या असलेल्या अभिनेत्री अंकिता कोंवर हिच्यासोबत त्याने तीन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये विवाह केला होता. हे जोडपेही आता तरुणाईमध्ये रोमँटिक कपल म्हणून लोकप्रिय ठरले असून सोशम मीडियात त्यांचे फोटो, प्रेमाचे किस्से व इतर भानगडी सातत्याने चर्चेत असतात. आता मिलिंद सोमनने त्याच्या …
 

मुंबई : गुणी (?)अभिनेता मिलिंद सोमन हा कायम चित्रविचित्र घटना, घडामोडींसाठी चर्चेत असतो. आपल्यासोबत वयाने निम्म्या असलेल्या अभिनेत्री अंकिता कोंवर हिच्यासोबत त्याने तीन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये विवाह केला होता. हे जोडपेही आता तरुणाईमध्ये रोमँटिक कपल म्हणून लोकप्रिय ठरले असून सोशम मीडियात त्यांचे फोटो, प्रेमाचे किस्से व इतर भानगडी सातत्याने चर्चेत असतात. आता मिलिंद सोमनने त्याच्या इमेजला साजेसे छायाचित्र सोशल मीडियात शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मिलिंदने चक्क अंकिताला लिपलॉक किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यांचा किसचा फोटो प्रचंड वेगाने व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्याचे कौतुकही केले आहे. तुम्ही दोघे खूपच रोमँटिक व किलर दिसत आहात,अशा शब्दांत काहींनी मिलिंद सोमन- अंकिताला दाद दिली आहे. अंकितानेही हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून या वीगन ड्रेसवर मुझे प्यार आ गया है, अशी रोमँटिक कॅप्शन दिली आहे.सोबतच तिने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. मिलिंद सोमन- अंकिता ही जोडी अ‍ॅथ्लिट म्हणूनही प्रसिद्ध आहे. याआधी मिलिंद सोमन बीचवर न्यूड होऊन धावत असताना चर्चेत आला होता. त्याही आधे त्याने एका बुट कंपनीसाठी मधू सप्रे या अभिनेत्रीसोबत अजगराच्या विळख्यात केवळ पायात बूट घालून न्यूड अ‍ॅड शूट केले होते. त्याच्या या अशा गोष्टींवर भरपूर टीका होत असली तरी तो मात्र याचे सातत्याने जाहीरपणे समर्थन करत आला आहे.