माॅडेल अपर्णाला येताहेत जीवे मारण्याच्‍या धमक्या!

मुंबई ः मायावी नगरीतील मोकळेपणा, तिथले रोमान्स, विवाहबाह्य संबंधाची चर्चा खुलवून सांगितली जायची. मायावी नगरीत काम मिळवण्यासाठी शय्यासोबतीस भाग पाडल्याचे आरोप अनेकदा झाले. पूर्वी त्याबाबत उघड कुणी बोलत नसे; परंतु “मी टू’ मोहिमेनंतर भीती न बाळता तक्रार करण्याचे धाडस केले जाते. अगोदर बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार करणाऱ्या माॅडेल अपर्णाने आता खुनाची धमकी येत असल्याचे आरोप …
 

मुंबई ः मायावी नगरीतील मोकळेपणा, तिथले रोमान्स, विवाहबाह्य संबंधाची चर्चा खुलवून सांगितली जायची. मायावी नगरीत काम मिळवण्यासाठी शय्यासोबतीस भाग पाडल्याचे आरोप अनेकदा झाले. पूर्वी त्याबाबत उघड कुणी बोलत नसे; परंतु “मी टू’ मोहिमेनंतर भीती न बाळता तक्रार करण्याचे धाडस केले जाते. अगोदर बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार करणाऱ्या माॅडेल अपर्णाने आता खुनाची धमकी येत असल्याचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
मॉडेल अपर्णा हिने गेल्या मे महिन्यात अभिनेता जॅकी भगनानी, फोटोग्राफर कोलस्टन ज्युलियन आणि इतर सात जणांविरुद्ध बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर्णाने चित्रपटसृष्टीतील नऊ जणांविरोधात फिर्याद दाखल केली होती. आता अपर्णाने तिला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा आरोप केला आहे. अपर्णाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “हे हाय प्रोफाइल लोक मला अजूनही दुसऱ्यामार्फत जिवे मारण्याची धमकी देत आहेत. ते बरेच हिंसक फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत आहेत. मी अशा अनेक अकाऊंट्सना ब्लॉक केले आणि काही अकाऊंटला रिपोर्ट केले आहे. ज्यांचे अकाऊंट मी रिपोर्ट केले, त्यांनी नावं वेगळीच होती. त्यांनी शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ त्रासदायक आहेत. या सगळ्या गोष्टी टाइप करताना देखील माझे हात थरथरत आहेत. या विषयी मी पोलिसांना माहिती दिली आहे; परंतु त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला आणि तक्रार दाखल करून घेतली; परंतु आता माझ्यात एवढी क्षमता नाही. या लोकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मला तीन आठवडे लागले होते,” असे अपर्णा म्हणाली. तिच्या म्हणण्याचा अर्थ पाहिला, तर पोलिस तिची तक्रार घेत नाहीत आणि कारवाई करण्याचे टाळतात, असा होतो.