मान्यताने नाकारलं ते गिफ्ट!
2021 हे वर्ष अनेक बॉलिवूड कलाकारांसाठी लकी ठरताना दिसत आहे. अनेक नव्या वर्षाप्रारंभीच लगीन उरकून घेतलं, काहींनी गृहप्रवेश केला. अभिनेता संजय दत्तने त्याच्या पत्नीला चक्क चार फ्लॅट गिफ्ट म्हणून दिले. मात्र, मान्यताने हे 100 कोटींचे फ्लॅट त्याला परत केले. मान्यताला गिफ्ट केलेले फ्लॅट पाली हिल येथील इम्पीरियल हाइट्स या इमारतीत आहेत. मात्र, ते मान्यताने एका …
Feb 12, 2021, 01:51 IST
2021 हे वर्ष अनेक बॉलिवूड कलाकारांसाठी लकी ठरताना दिसत आहे. अनेक नव्या वर्षाप्रारंभीच लगीन उरकून घेतलं, काहींनी गृहप्रवेश केला. अभिनेता संजय दत्तने त्याच्या पत्नीला चक्क चार फ्लॅट गिफ्ट म्हणून दिले. मात्र, मान्यताने हे 100 कोटींचे फ्लॅट त्याला परत केले. मान्यताला गिफ्ट केलेले फ्लॅट पाली हिल येथील इम्पीरियल हाइट्स या इमारतीत आहेत. मात्र, ते मान्यताने एका आठवड्यातच त्याला परत केले. या चारही मालमत्तांसाठी 26.5 कोटी रुपये सरकारने ठरविलेलं मूल्य आहे. परंतु, युनिटचे बाजार मूल्य हे 100 कोटींपेक्षा जास्त आहे. कर वाचवण्यासाठी मान्यताने हे केल्याचं म्हटलं जात आहे. चार फ्लॅटपैकी दोन अपार्टमेंट तिसर्या आणि चौथ्या मजल्यावर आहेत. 11 व्या आणि 12 व्या मजल्यावर एक पेन्टहाऊस आहे.