बाप्पा, राखीची भूमिका तेही आलिया साकारणार?

फटकळ स्वभाव आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतने नुकतीच एक व्यक्त केलेली अपेक्षा ऐकूनही सर्वांचेच कान ताठ झाले आहेत. राखी सावंतवर म्हणे बायोपिक बनणार आहे आणि या बायोपिकमध्ये राखीची भूमिका आलिया भट्टने साकारावी, अशी इच्छा राखीने व्यक्त केली आहे.गीतकार जावेद अख्तर यांना आपल्या जीवनावर चित्रपट बनवायचा आहे, असे राखीने म्हटल्यानंतर खरंतर कुणाचाच विश्वास …
 

फटकळ स्वभाव आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतने नुकतीच एक व्यक्त केलेली अपेक्षा ऐकूनही सर्वांचेच कान ताठ झाले आहेत. राखी सावंतवर म्हणे बायोपिक बनणार आहे आणि या बायोपिकमध्ये राखीची भूमिका आलिया भट्टने साकारावी, अशी इच्छा राखीने व्यक्त केली आहे.
गीतकार जावेद अख्तर यांना आपल्या जीवनावर चित्रपट बनवायचा आहे, असे राखीने म्हटल्यानंतर खरंतर कुणाचाच विश्वास बसला नाही. मग जावेद यांना विचारणा केल्यानंतर तिचे बोलणे खरे होते याची खात्री सर्वांनी पटली. आपली भूमिका आलियानेच का साकारावी, याबद्दल राखीने खुलासाही केला आहे. ती म्हणाली, की “आलिया बोल्ड आहे. तिला कोणाचीही भीती वाटत नाही. जी अभिनेत्री माझी भूमिका साकारेल तिच्यात हा गुण असला पाहिजे, असे राखी म्हणाली. आलियानंतर राखीची पसंती प्रियांका चोप्रा आणि राधिका आपटेला आहे. या दोघीदेखील बोल्ड आहेत. आयुष्यात अनेक चढ-उतार मी पाहिले आहेत. माझा आत्मसन्मान कमी होऊ दिला नाही. माझ्या आयुष्यात अनेक लक्ष्मणरेषा ओलांडल्या आणि आदरपूर्वक जीवन जगण्याचे मी काम केले आहे, असे राखीने म्हटले आहे. चार-पाच वर्षांपूर्वी विमानात जावेद अख्तर आणि राखीची भेट झाली हाेती. त्यावेळी राखीने तिच्या लहानपणीच्या कथा जावेद यांना सांगितल्या. त्यावर जावेद यांनी मला तुझ्या बायोपिकसाठी स्क्रिप्ट लिहायला आवडेल, असे सांगितले होते.