परिणिती म्हणते, मला तर विश्वासच बसत नाहीये की मी हे केलं…!
अभिनेत्री परिणिती चोप्राने आपली बहीण प्रियांका चोप्राच्या पावलावर पाऊस ठेवून हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजवर तिचे कायम स्मरणात राहील, असे चित्रपट हिट झाले नसले तरी आपल्या अभिनयाने मात्र तिने चाहत्यांचा एक मोठा वर्ग निर्माण केला आहे. ती सतत काही ना काही नवीन करत असते. या नाविण्याच्या शोधातून तिने तिच्या नव्या चित्रपटात चक्क गाणे म्हटले आहे. तिचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा नवीन चित्रपट नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झाला असून, चित्रपटात तिने ‘मतलबी यारीयाँ’ हे गाणं स्वतः म्हटले आहे. गाणं गायल्यानंतर जेव्हा तिने ऐकलं तेव्हा तीच थक्क झाली. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की मला गाणं गायची संधी मिळाली, अशी प्रतिक्रिया तिची होती. तिने हे गाणे आपल्या सोशल मीडिया खात्यावरही शेअर केले आहे. चाहत्यांनाही ते प्रचंड आवडले असून, सर्वांनीच कौतुकाचा वर्षाव केला आहे. या चित्रपटात परिणिती स्मरणशक्ती हरवलेल्या मुलीची भूमिका साकारत असून, अभिनेत्री आदिती राव हैदरीही यात महत्त्वाच्या भूमिकेत आहे, हे विशेष.