घर, कुटुंब, आईला वाचविण्यासाठी तुम्ही पोलिसांची वाट पाहता का?; शक्‍तीमान भडकला!

मुंबई : अभिनेता मुकेश खन्ना अर्थात कधीकाळचा सर्वांचा लाडका शक्तीमान सध्या गोहत्या करणाऱ्यांवर व गाईचे मांस खाणाऱ्यांवर भडकला आहे. त्याने व्टिटरवर एक व्हिडिओ अपलोड केला असून, गायींची कत्तल करणाऱ्यांविरुद्ध व गोमांस भक्षण करणाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. मुकेश खन्ना म्हणतात, की आपण कल्की अवताराची प्रतीक्षा करतोय का? ते येतील आणि गोमातेला वाचवतील? घर आणि कुटुंब …
 
घर, कुटुंब, आईला वाचविण्यासाठी तुम्ही पोलिसांची वाट पाहता का?; शक्‍तीमान भडकला!

मुंबई : अभिनेता मुकेश खन्‍ना अर्थात कधीकाळचा सर्वांचा लाडका शक्‍तीमान सध्या गोहत्या करणाऱ्यांवर व गाईचे मांस खाणाऱ्यांवर भडकला आहे. त्‍याने व्टिटरवर एक व्हिडिओ अपलोड केला असून, गायींची कत्तल करणाऱ्यांविरुद्ध व गोमांस भक्षण करणाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

मुकेश खन्‍ना म्हणतात, की आपण कल्की अवताराची प्रतीक्षा करतोय का? ते येतील आणि गोमातेला वाचवतील? घर आणि कुटुंब आणि आईला वाचविण्यासाठी तुम्ही पोलिसांची वाट पाहता का? मग गाय ही आपली माता आहे हे सांगण्याची गरज का पडावी, असे खन्‍ना व्हिडिओत म्हणाले आहेत. उघडपणे लोक गायीचे मांस खातात. तिला कापतात. तिची निर्यात होते. विदेशातून लोक गायीचे मांस खाऊन येतात आणि इथे आल्यावर त्यांना गायीचे मांस हवे असते. सरकारने गोहत्याबंदी कायदा देशभरात लागू करावा, असेही खन्‍ना म्हणाले आहेत.