करिना कपूरने दुखावल्या ख्रिश्चन समाजाच्‍या भावना!

बीड ः बेस्ट सेलरच्या यादीत असलेले बाॅलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि तिची सहकारी लेखक आदिती शहा यांचे ‘करिना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ नावाचे पुस्तक आता चांगलेच वादात सापडले आहे. बायबल या शब्दाला आक्षेप घेण्यात आला आहे. या पुस्तकामुळे भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी करिना आणि शहा या दोघींचे ‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ …
 

बीड ः बेस्ट सेलरच्या यादीत असलेले बाॅलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि तिची सहकारी लेखक आदिती शहा यांचे ‘करिना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ नावाचे पुस्तक आता चांगलेच वादात सापडले आहे. बायबल या शब्दाला आक्षेप घेण्यात आला आहे. या पुस्तकामुळे भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी करिना आणि शहा या दोघींचे ‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकामुळे आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकाच्या नावामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप ख्रिश्चन समाजातील ‘अल्फा ओमेगा ख्रिश्चन’ या संघाने केला आहे. करिना कपूरविरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने करिनावर गंभीर आरोप केले आहेत. ख्रिश्चन धर्मियांचा बायबल हा पवित्र धर्मग्रंथ असताना प्रेग्नन्सीशी संबंधित पुस्तकाच्या नावात करिना कपूर व तिच्या सहलेखक आदिती शहा यांनी बायबल शब्दाचा वापर करून, भावना दुखावल्या आहेत. या पुस्तकातील बायबल शब्द तत्काळ हटवावा अशी मागणी करून, धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी कलम 295 अ अंतर्गत करिना कपूर आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.