कनिकाचे दमदार कमबॅक… दिसतेय पहिल्यापेक्षा भारी!
अभिनेत्री कनिका माहेश्वरी दमदार कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. दीर्घ विश्रांतीनंतर ती आता मालिकांत पुन्हा दिसणार असून, क्यों उत्थे दिल छोड आये… या मालिकेत एका विधवेची भूमिका साकारणार आहे. आता ती अधिक फिट आणि तरुण दिसत असल्याने आकर्षक भासत आहे.
कनिकाने आपल्या बाळासाठी कामातून ब्रेक घेतला होता. बाळ आता बऱ्यापैकी मोठे झाल्याने तिने कलाक्षेत्रात पुनरागमन केले आहे. कनिका सांगते, की लॉकडाऊनच्या काळात मी रोज व्यायाम केला. मी कधीकधी नुसता डाळभात खायचे. पण मी व्यायाम चुकवला नाही. हे सोपं नव्हतं. या काळात मी माझ्या डाएटवर लक्ष दिलं, असं ती म्हणाली. फिटनेसचा प्रवास शारीिरकपेक्षा मानसिक अधिक होता. त्यामुळे मी आधी मनाने फिट झाले आणि नंतर शरीराने, असे तिने सांगितले. होणाऱ्या टीकेवर तिने परखड मत मांडले असून, ती म्हणाली, की टीकेचा सामना करण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायला शिका किंवा तुम्ही त्या टीकेचा सामना करा. मी तेच केलं आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. तुमच्यावर होणारी टीका कारात्मक पद्धतीने स्वीकारा आणि मग बघा तुमच्यात कसे बदल घडतात ते, असे कनिका म्हणाली. कनिकाने या पूर्वी ‘कहानी घर घर की’, ‘राजा की आयेगी बारात’, ‘कभी आए ना जुदाई’, ‘विरासत’, ‘गीत हुई सबसे पराई’, ‘दिया और बाती हम’ या मालिकांमध्ये काम केले आहे. असून, दिया और बाती हम या मालिकेच्या सिक्वेलमध्येही ती काम करत होती.