Info : पुरुषांनो केस गळतीने हैराण आहात; मग ही माहिती वाचाच…
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अलीकडच्या युगात स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही केस गळतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अतिकाम, ताणतणाव, चिंता,अनुवंशिकता, हार्मोन्स आणि केसांसाठी वापरण्यात येणारे केमिकल युक्त तेल यामुळे या समस्या वाढल्या आहेत. काही तरुणांना तर अगदी विशीतच केस गळतीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे लग्नाचे वय येईपर्यंत अर्धे टक्कल पडलेले असते. सर्वसामान्यपणे वयाच्या ३५ वर्षांनंतर पुरुषांना …
Oct 9, 2021, 15:28 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अलीकडच्या युगात स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही केस गळतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अतिकाम, ताणतणाव, चिंता,अनुवंशिकता, हार्मोन्स आणि केसांसाठी वापरण्यात येणारे केमिकल युक्त तेल यामुळे या समस्या वाढल्या आहेत. काही तरुणांना तर अगदी विशीतच केस गळतीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे लग्नाचे वय येईपर्यंत अर्धे टक्कल पडलेले असते. सर्वसामान्यपणे वयाच्या ३५ वर्षांनंतर पुरुषांना केस गळतीचा त्रास सुरू होतो. पुढील ५ वर्षात जवळ जवळ पूर्णपणे टक्कल पडलेलं असतं. त्यामुळे या समस्येवर वेळीच उपाय केले तर या अडचणीपासून मुक्ती मिळू शकते…
हे करा उपाय…
- अँटी फंगल शाम्पू : केटोकेनोझोल हे टाळूवरील कोणत्याही संसर्गाशी प्रभावीपणे लढा देते. त्यामुळे हा शाम्पू कमीत कमी पाच मिनिटे टाळूवर लावून ठेवावा.
- आवळा पावडर आणि निंबाचा रस याच मिश्रण डोक्यावर लावावे. सुकल्यानंतर धुवून टाकावे. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्याने फायदा होतो.
- अंड्यातील पिवळा बलक काढून डोक्यावर ३० मिनिटे लावावा. त्यानंतर शाम्पू आणि कंडिशरने केस धुवून टाकावेत.
- आठवड्यातून एकदा गरम खोबरेल तेल आणि ग्रीन टीने टाळूची मालीश करावी. यामुळे टाळू उत्तेजित होते आणि केस गळण्यास प्रतिबंध होतो.