Info : स्वप्नात या ५ गोष्टी दिसल्या तर असतात धनप्राप्तीचे संकेत!

 
ज्योतिषशास्त्र तसेच स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा एक वेगळा अर्थ असतो. अनेकांना स्वप्ने पडतात. काही स्वप्ने चांगली तर काही स्वप्ने अशुभ संकेत देत असतात. काही स्वप्नं भविष्यातील घटनांचे भाकीत करीत असतात. स्वप्नात काही खास गोष्टी दिसणे हे धनप्राप्तीचे संकेत मानले जाते...

 शास्त्रानुसार स्वप्नात उंदीर दिसणे हा शुभ संकेत मानला जातो. स्वप्नात उंदीर दिसत असेल तर अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. स्वप्नात उंदीर दिसणे हे जीवनात समृध्दी  येण्याचे लक्षण असते. स्वप्नात दूध देणारी गाय दिसणे हा शुभ संकेत मानला जातो. हे स्वप्न जीवनात आनंद आणि समृध्दी दर्शविते. स्वप्नात कुणीतरी नृत्य करत असल्याचे दिसणे हा तसा मनोरंजनाचा भाग समजला जातो.

मात्र एखाद्या मुलीला आपण स्वतः नृत्य करत आहोत, असे स्वप्न पडत असल्यास तिला धनलाभ लोणार असा तो संकेत असतो. स्वप्नात देवाचे दर्शन होणे अतिशय शुभ मानले जाते. तुमच्या आयुष्यात दैवी कृपा होणार आहे असा त्याचा संकेत असतो. लवकरच तुम्हाला सुख समृद्धी आणि धनप्राप्ती होईल असा त्या स्वप्नाचा अर्थ असतो. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात मासे दिसणे शुभ मानले जाते. स्वप्नात मासे दिसत असतील तर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत आहे असा त्या स्वप्नाचा अर्थ असतो.