महिलांच्‍या शरीरावर कुठे असतो अशुभ तीळ?

मुंबई ः महिला असो की पुरुष शरीरावर एक ना एक तीळ असतोच. तीळ असणे शुभ असल्याचे सांगितले जाते. मात्र काही ठिकाणचे तीळ अशुभही असतात, असे समजले जाते. खास महिलांच्या शरीरावर या भागांवर आढळलेल्या तिळांबद्दल दुष्परिणाम होऊ शकतात, असे शास्त्र सांगते.छातीवर डाव्या बाजूला तीळ असेल तर संसारिक सुख महिलेला मिळत नाही. पतीसोबत तिचे कायम मतभेद होत …
 
महिलांच्‍या शरीरावर कुठे असतो अशुभ तीळ?

मुंबई ः महिला असो की पुरुष शरीरावर एक ना एक तीळ असतोच. तीळ असणे शुभ असल्याचे सांगितले जाते. मात्र काही ठिकाणचे तीळ अशुभही असतात, असे समजले जाते. खास महिलांच्या शरीरावर या भागांवर आढळलेल्या तिळांबद्दल दुष्परिणाम होऊ शकतात, असे शास्‍त्र सांगते.
छातीवर डाव्या बाजूला तीळ असेल तर संसारिक सुख महिलेला मिळत नाही. पतीसोबत तिचे कायम मतभेद होत राहतात. डाव्‍या बाजूचा तीळही सुखसमाधानाने राहू देत नाही. बेंबीजवळ तीळ असेल तर शारीरिक व्याधींना सामोरे जाऊ लागू शकते. पैसे आजारांवरच खर्च होत असल्याने अशा महिला आर्थिक संकटातही सापडतात. कपाळावर डाव्या बाजूला तीळ असणारी महिला बुद्धिमान असते. मात्र ती प्रचंड खर्चिकही असते. त्‍या बोलघेवड्या असतात, पण कुणावर लगेच विश्वासही टाकतात. कपाळाच्या मध्यभागचा तीळ मात्र अशुभ असतो. मुठीतील तीळ धनप्राप्ती घडवतो. उजव्या डोळ्यावर तीळ असणाऱ्या महिला नेहमी दुसऱ्याचा दुस्वास करतात. डोळ्याच्या किनाऱ्यावर तीळ असेल तर या महिला गविष्ठ असतात. ओठावर तीळ असणाऱ्या महिलांना जोडीदाराचा पाठिंबा मिळत नसल्याने वैवाहिक सुखाच्‍या बाबतीत त्‍या कमनशिबी असतात.