समाजकार्याची आवड आहे? भारतीय महाक्रांती सेनेत पदाधिकारी निवडणे सुरू; संपर्काचे आवाहन
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भारतीय महाक्रांती सेनेची सध्या जिल्हा पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू आहे. समाजकार्य करण्यास इच्छुक युवक, व्यक्तींनी तातडीने संपर्क करण्याचे आवाहन विदर्भ अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील व बुलडाणा जिल्हा अध्यक्ष प्रा. वैभव दाभाडे पाटील यांनी केले आहे.
भारतीय महाक्रांती सेना एक सामाजिक संघटना असून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात पदाधिकारी नेमण्यात आले आहेत. पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या भागांत भारतीय महाक्रांती सेनेचे सामाजिक कार्य प्रशंसनीय आहे. कोरोना काळात संघटनेच्या माध्यमातून अनेक गरजूंना भरघोस मदत करण्यात आली आहे. या काळात सर्वप्रथम भारतीय महाक्रांती सेनेच्या माध्यमातून समाजासाठी देशासाठी लढणार्या कारोना योद्ध्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. भारतीय महाक्रांती सेना समाजासाठी देशासाठी कार्य करत आहे. विदर्भात संघटना बळकट करण्यासाठी तसेच बुलडाणा जिल्ह्यात संघटनेचे पदाधिकारी शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांची निवड करण्याची प्रक्रिया होत आहे. समाजासाठी धडपडणार्या कार्य करून उचित असणार्या युवकांसाठी भारतीय महा क्रांतीसेना सतत पुढे असते. अशाच युवकांना एक सुवर्णसंधी भारतीय महाक्रांती सेनेच्या माध्यमातून मिळत आहे. संपर्कासाठी मो. 7066432459