डाक विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा; सहभागी व्हा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भारतीय डाक विभागाने 15 वर्षापर्यंतच्या युवांसाठी write a letter to a family member about your experience with covid -19 या विषयावर आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेचे आयेाजन केले आहे. स्पर्धा 4 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी इंग्रजी, मराठी, हिंदी यापैकी कुठल्याही एका भाषेत पत्रलेखन लिहायचे आहे. स्पर्धेसाठी राज्य स्तरावर प्रथम पारितोषिक 25 हजार रुपये, द्वितीय 10 हजार रूपये व तृतीय पारितोषिक 5 हजार रुपये असणार आहे. तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रथम 50 हजार रुपये, द्वितीय 25 हजार रूपये व तृतीय 10 हजार रुपये बक्षीस असणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी जवळच्या डाक घरामध्ये किंवा www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. स्पर्धेसाठी जास्तीत जास्त युवक – युवतींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन डाक अधीक्षक ए. के इंगळे यांनी केले आहे.