झळा पाणी टंचाईच्‍या… ‘या’ 18 गावांत केल्या उपाययोजना!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाणीटंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील 14 व लोणार तालुक्यातील 4 गावांसाठी 20 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. विंधन विहिरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे. विंधन विहिरी मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख, हिवरा खुर्द, पिंपळगाव उंडा, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पाणीटंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील 14 व लोणार तालुक्यातील 4 गावांसाठी 20 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. विंधन विहिरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.

विंधन विहिरी मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख, हिवरा खुर्द, पिंपळगाव उंडा, माळेगांव, वर्दडा, पेनटाकळी, अंबाशी, मोहखेड, पारखेड, उटी, नायगाव देशमुख, शेंदला, लव्हाळा, चिंचाळा, लोणार तालुक्यातील शिवणी पिसा, नांद्रा, सुलतानपूर व गोवर्धननगर या गावांसाठी मंजूर करण्यात आली आहे. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.