जामठी, तराडखेड, जनुना लसीकरण केंद्राला शिवसेना जिल्हाप्रमुखांची भेट

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना महामारीची दुसरी लाट अतिशय धोकादायक आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना लसीकरणाच्या बाबतीत जनजागृती केली आहे. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. ग्रामीण भागात सुध्दा आता जनजागृती झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी आज, 16 मे रोजी जामठी, तराडखेड व …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना महामारीची दुसरी लाट अतिशय धोकादायक आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना लसीकरणाच्या बाबतीत जनजागृती केली आहे. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. ग्रामीण भागात सुध्दा आता जनजागृती झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी आज, 16 मे रोजी जामठी, तराडखेड व जनुना या लसीकरण केंद्राला भेट दिली. नागरिकांची कोरोना विषयक जनजागृती केली. यावेळी तालुकाप्रमुख लखन गाडेकर, संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.