जंगलात आग लाग नये म्हणून जाळले रस्त्याच्या कडेचे गवत!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जंगलात आग लागण्याची शक्यता गृहित धरून वनविभागाने आधीच खबरदारी घेऊन रस्त्याच्या कडेलगतचे वाळलेले गवत देऊळगाव तालुक्यात जाळले.तालुक्यातील गिरोली खुर्द व जांभोरा या दोन गावांमिळून वन विभागाची मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणावर प्राण्यांची संख्या आहे. जंगलात प्रामुख्याणे हरीण, रोही, ससा व पक्ष्यांचा वावर आहे. …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जंगलात आग लागण्याची शक्यता गृहित धरून वनविभागाने आधीच खबरदारी घेऊन रस्त्याच्या कडेलगतचे वाळलेले गवत देऊळगाव तालुक्यात जाळले.
तालुक्यातील गिरोली खुर्द व जांभोरा या दोन गावांमिळून वन विभागाची मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणावर प्राण्यांची संख्या आहे. जंगलात प्रामुख्याणे हरीण, रोही, ससा व पक्ष्यांचा वावर आहे. या दोन्ही गावांजवळील वन विभागाच्या जंगलातून एक देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा रस्ता व देऊळगाव राजा ते माळसावरगाव हे दोन रस्ते जातात. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. यामुळे कोणतीही घटना घडू शकते. येणारे जाणारे बिडी, सिगारेट पिऊन रस्त्याच्या कडेला टाकतात. यापासून जंगलात आग सुध्दा लागू शकते. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचार्‍यांनीच रस्त्याच्या दुतर्फा भागातील वाळलेले गवत जाळून टाकले. आता उन्हाळा लागत आहे. मोठ्या प्रमाणावर जंगल असल्यामुळे उन्हाळ्यात आग (वनवा) लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने वन विभागाने ही खबरदारी घेतल्याचे सांगण्यात आले. वन विभागाच्या वतीने मुक्या प्राण्यासाठी पाण्याची व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे.