चिखलीत आज रामा ट्रॅक्टर्सचा वर्धापनदिन सोहळा! ग्राहक मेळावा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन; जॉन डियर कंपनीच्या नवीन मॉडेल चे होणार अनावरण..

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या २० वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना खात्रीशीर ,विश्वसनीय सेवा देणाऱ्या व ट्रॅक्टर विक्रीमध्ये विक्रम करणाऱ्या रामा ट्रॅक्टर्स चा २० वा वर्धापन दिन सोहळा आज,६ सप्टेंबरला चिखलीत संपन्न होत आहे. जॉन डियर ट्रॅक्टर्स चे अधिकृत विक्रेते असलेल्या रामा ट्रॅक्टर्स च्या वतीने आज भव्य ग्राहक मेळावा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. चिखली शहरातील एमआयडीसी मध्ये असलेल्या रामा रिसॉर्ट मध्ये सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे. जॉन डियर कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर परमेश्वर बिराजदार, सहाय्यक एरिया मॅनेजर सतीश इंगळे, सर्व्हिस इंजिनियर चंद्रभान कोळपे, टेक्निकल मार्केटिंग तसेच प्रॉडक्ट स्पेशलिस्ट आशिष चौधरी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
Rts
जॉन डियर ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेते असलेल्या रामा ट्रॅक्टर्स ला आज,२० वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या २० वर्षांत जिल्ह्यात सर्वाधिक ट्रॅक्टर विक्री करण्याचा विक्रम रामा ट्रॅक्टर्स ने केला आहे. रामा ट्रॅक्टर्स चे संचालक निवृत्तीसेठ राजपूत आणि शिवदास उर्फ पप्पुसेठ राजपूत यांनी केलेली मेहनत, ग्राहक,शेतकऱ्यांचा कमावलेला विश्वास, तत्परतेची सेवा यामुळेच ही वाटचाल शक्य झाली आहे. आज होत असलेल्या वर्धापन दिन सोहळ्यातही शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न रामा ट्रॅक्टर्स कडून केल्या जात आहे. 
शेतकऱ्यांना मिळणार या गोष्टींचे मार्गदर्शन...
आज होणाऱ्या मेळाव्यात भारत सरकारने आणलेल्या Crdi इंजिन पद्धतीबद्दल माहिती व त्याचे फायदे याबद्दल सांगण्यात येणार आहे. शिवाय ट्रॅक्टर च्या मेन्टेनन्स बद्दल माहिती, नवीन ट्रॅक्टर खरेदी करतांना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन, एक्सचेंज मध्ये होत असलेली गुंतागुंत व नुकसान, फायनान्स च्या विविध स्कीम, सिबील बद्दल माहिती तसेच नवीन तंत्रज्ञान अवजारे, हार्वेस्टिंग याबद्दल शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जॉन डियर ट्रॅक्टर चे नवीन मॉडेल 5310 BS4/CRDI याचा अनावरण सोहळा देखील संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला जॉन डियर ट्रॅक्टर्स चे ग्राहक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रामा ट्रॅक्टर्स चे संचालक निवृत्तीसेठ राजपूत व पप्पुसेठ राजपूत यांनी केले आहे.
(advt)